Skip to main content

Posts

शत्रुबुद्धि विनाशाय

शत्रुबुद्धि विनाशाय… (दिपावलीचा आजवर कधीही न ऐकलेला आशय) तुम्ही कधी कोणाशी कडकडून भांडला आहात का? म्हणजे लहानपणीच्या खेळातल्या भांडणापासून ते मोठेपणीच्या रस्त्यावरच्या भांडणापर्यंत कुठेही, कधीही, कोणत्याही कारणानं? अर्थातच भांडला असालच. कारण कधीच कोणाशीच कोणत्याही कारणानं न भांडलेली माणसं एकतर अत्यंत लेचिपेची, बुळी, दयनीय असतात किंवा अत्यंत महान आणि संतपदी वगैरे पोचलेली असतात. ही दोन्ही टोकाची माणसं सोडली तर, नॉर्मल माणसं भांडतात! सकारण, अकारण, विनाकारण, कोणत्याही कारणानं आणि कारण नसतानाही भांडतात. जिवलगांशी, नात्यातल्यांशी, शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी, ओळख असलेल्यांशी, अनोखळी माणसांशी, खऱ्या मित्रांशी, ऑनलाईन कनेक्शन्सशी, सगळ्या-सगळ्यांशी भांडतात. भांडणाला काहीही कारण पुरतं. नवऱ्यानं करपवलेलं दुधाचं पातेलं असो किंवा बायकोनं खारट केलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. हट्टीपणा करणारे म्हातारे आई-बाप असोत किंवा होमवर्क न करणारा मुलगा. आपल्या पार्किंगमध्ये चुकून गाडी पार्क करणारा शेजारी असो किंवा सिग्नलला आपल्या मागे हॉर्न वाजवत उभा असणारा कोणी अनोळखी माणूस. आपल्या पोस्टवर टीका करणारा अनोळखी माणूस असो क...
Recent posts

सॅल्युट

  सॅल्युट  जेव्हां तो सुंदरनगरच्या रेल्वे स्टेशनवर उतरला तेव्हा घड्याळात बरोबर रात्रीचे साडेअकरा वाजले होते. सुंदरनगरहून मुंबईला जाणारी पहिली ट्रेन पहाटे पाच वाजता होती. याचाच अर्थ त्याच्याकडे त्याच्या कामासाठी मोजून साडेपाच तास होते. आणि त्याच्यासारख्या सराईत इसमासाठी तेवढे नक्कीच पुरेसे होते.        सुंदरनगर मधील उच्चभ्रू लोकांच्या आलीशान बंगल्यांच्या वस्तीचा अभ्यास त्याने नेटवरील गुगल मॅप वरून अगोदरच करून ठेवला होता.      रेल्वेस्टेशन बाहेरील पानाच्या ठेल्यावरून त्याने फोरस्क्वेअर घेतली आणि रुबाबात शिलगावली. पान स्टॉल जवळ उभे राहून तो टू व्हीलर पार्किंगचे निरीक्षण करत थांबला.      त्याचे व्यक्तिमत्त्व अत्यंत रुबाबदार होते. सहा फुटाचे व्यायामाने कमवलेले शरीर, गोरापान राजबिंडा चेहरा, ब्लॅक जीन्स, त्याच्यावर डार्क ब्लू कलर चा ओपन शर्ट, डोळ्याला गोल्डन फ्रेमचा अतिशय महागडा चष्मा. पायात ॲदादासचे शुज, मनगटावर रोलेक्स चे घड्याळ आणि पाठीवर महागडी प्रवासी सॅक. जणू काही एखादा राजकुमारच.    ट्रेनमधून उतरलेले प्रवासी पार्किंग ...

हिट मराठी नाटके

 हिट मराठी नाटके बटाट्याची चाळ https://youtu.be/5i1xaSZeyOM श्रीमंत दामोदर पंत https://youtu.be/U7350LnlKCk शांतता ! कोर्ट चालु आहे https://youtu.be/QG_Pi051qao नटसम्राट https://youtu.be/yTFPT7-v-Ws ती फुलराणी https://youtu.be/PLHfek5SO_Q तो मी नव्हेच https://youtu.be/8TAToq08YuQ पती सगळे उचापती https://youtu.be/6IZXCmrE09s मोरुची मावशी https://youtu.be/eCOeRK9N7QM एका लग्नाची गोष्ट https://youtu.be/JZl_zwm_IPI हसवा फसवी https://youtu.be/v4-MqXYJq6o गेला माधव कुणीकडे https://youtu.be/1gEZ0WePqV4 तुझे आहे तुजपाशी https://youtu.be/sTZGYKAWc_4 असा मी असामी https://youtu.be/S38SOv4f95w शांतेच कार्ट चालु आहे https://youtu.be/twOnQ3JCTxE श्री तशी सौ https://youtu.be/N4pwOnoY7zY वासु ची सासू https://youtu.be/-m3iruEQoJE अखेरचा सवाल https://youtu.be/DmuCU9Y33sg शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8 चल कहितरीच काय https://youtu.be/blOdn2nbDgw चार दिवस प्रेमाचे https://youtu.be/PD-mBpCvTAw मी नथुराम गोडसे बोलतोय https://youtube....

लुईस पाश्चर

जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. फ्रान्समधल्या एका गावात कुणी तरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली.. किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘ लुईस .’ निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली.. निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला...महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘ लुईस पाश्चर ’.  लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं...मदतनीस रक्स च्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले..या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं.....

मनातलं शब्दात

मनातलं शब्दात            काल मी व माझी मैत्रीण छाया बाजारात जायला निघालो . समोरच  बस उभी  होती. म्हंटल चला आज बसने जाऊ .बस मधे चढ़णे उतरणे  म्हणजे या वयात तसं सोपं नसतं. पण मधुन मधुन मला हे अस करायला आवडत .आपला confidence पण वाढतो.  व पैसेही वाचतात ना. आपली पीढी पैसे वाचवायचा  एकही   Chance  सोडत नाही. वीस मिनिटे चालून ,वीस रुपये वाचविणे, छान जमते आपल्याला .व काही तरी विशेष केल्याचे समाधान ही मिळते . नवीन पीढीला  हे  पटण्यासारखे  नाही. व आवडत तर त्याहूनही  नाही.  असो,  यालाच  जनरेशन गॅप म्हणतात .             मी व छाया बस मधे चढलो तर खरं. पण आतली गर्दी बघून जीव घाबरला. बसायला जागा नव्हती. तेवढ्यात एक सीट रिकामी झाली .आमच्याच  बरोबर चढलेली  एक बाई  सहज तेथे बसू शकत होती .पण तिने ती सीट मला दिली.  पूढच्या stop. वर पुन्हा तेच घडले. पुन्हा तिने आपली सीट दुसऱ्याला दिली. आमच्या पूर्ण बस प्रवासात हा प्रकार चारदा  घडला. ही बाई अगदी सामान्...

विठा

तमाशा किंवा तमाशा कलावंत म्हटले की लोकं नाक मुरडतात नाही तर तोंड वाकडे करतात.त्यांना समाजात फारसा मान दिला जात नाही. पण त्यांच्या मध्ये ही किती " टॅलेंट " असतो हे बघा....स्वतंत्र भारताच्या प्रत्यक्ष "राष्ट्रपतींना"देखिल ,दोन मिऩीटे "थांबा" असे सांगणारी ...... सतत दोन वेळा " राष्ट्रपती पारीतोषीक " मिळवणाऱ्या " विठाबाई भाऊ नारायणगांवकर ..." सन 1946 साली , कराड तालूक्यातील, 'गोळेगांव' मुक्कामी त्यावेळचे नावाजलेले दोन फड समोरासमोर 'सामन्या'साठी ऊभे ठाकले होते..! एक होता, भाऊ अकलेकर , तर दुसरा होता भाऊ नारायणगांवकर... यांच्या सवालजवाबातील जुगलबंदी पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय जमला असताना , केवळ तमाशात 'स्त्रिनर्तीका' नाही म्हणून कै.भाऊ नारायणगावकरांना हार पत्करावी लागली..!! ऊभ्या महाराष्ट्रात भाऊंनी आत्तापर्यंत "हार" पाहीली नव्हतीच.... हा अपमान भाऊंच्या जिव्हारी लागला होता..!! त्यावेळी "विठा" , कै.मामा वरेरकरांच्या कलापथकात, मुंबईमध्ये काम करीत होती. स्वत: भाऊंनीच तिची अभिनयातील निपुणता वाढवण्यास...

भारतातली पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर

डॉ. रखमाबाई राऊत... आज त्यांची १५५ वी जयंती... ज्या काळात बाईच्या तोंडून शब्दही बाहेर पडणं कठीण होतं, त्या काळात हिनं एक मोठ्ठा उठाव केला. भारतातली ती पहिली महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर... आणि घटस्फोट घेणारी ती पहिली महिला... नो मिन्स नो हे तिनं १८८० सालीच निक्षून सांगितलं होतं. Dr. Rakhmabai Raut भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर त्याकाळात बाईला ब्र काढणंही मुश्कील होतं, तो हा काळ.... त्यावेळी बंड करणारी, अनिष्ट चाली-रुढींविरोधात एल्गार पुकारणारी आणि त्यासाठी न्यायाव्यवस्थेला गदगदा हलवणारी ही बाई... डॉ. रखमाबाई भिकाजी राऊत... भारतात डॉक्टरकी म्हणून व्यवसाय करणारी पहिली डॉक्टर अशीही तिची ओळख... भारतातल्या पहिली डॉक्टर होण्याचा मान जरी आनंदीबाई जोशींना मिळत असला, तरी आनंदी जोशींनी डॉक्टरकीची प्रॅक्टिस केली नाही... भारतातली पहिली प्रॅक्टिसिंग डॉक्टर म्हणून डॉ. रखमाबाई राऊत हेच नाव इतिहासात लिहिलं गेलं. 'मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही' रखमाबाईची गोष्ट प्रचंड प्रेरणादायी... अठराव्या शतकात मी माझ्या विठ्ठलाबरोबर राहणार नाही, हे सांगण्याचं धाडस या रखमेनं दाखवलं... रखमाबाईची ही गोष्...