जवळपास दोनशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.. फ्रान्समधल्या एका गावात कुणी तरी एका नऊ वर्षाच्या मुलाची किंकाळी ऐकली.. किंचाळणाऱ्या मुलाचं नाव होतं ‘निकोल’ अन् ती ऐकणाऱ्याचं नाव होतं ‘ लुईस .’ निकोलला कुत्र्यानं चावा घेतला अन् गर्दी जमा झाली.. निकोल किंचाळतांनाचा कुत्र्यासारखंच दात विचकून गुरगुरू लागला-त्याचं शरीर आकुंचन पावलं-त्याला पाण्याची भिती वाटू लागली-हळूहळू तो इतरांनाही चावण्याचा प्रयत्न करू लागला...महिन्याभरात निकोल देवाघरी गेला आणि त्याचं किंचाळणं चाळीस वर्षे ऐकू येणारा त्याचा मित्र पुढं जाऊन जगातला एक महान शास्त्रज्ञ बनला..पन्नास वर्षीय त्या शास्त्रज्ञाचं संपुर्ण नाव होतं ‘ लुईस पाश्चर ’. लुईस यांनी या काळात अनेक संशोधनं केले पण त्यांच्या कानात रोज निकोलच्या किंचाळण्याचा आवाज येत राहिला मग त्यांनी चावणाऱ्या-पिसाळलेल्या कुत्र्यांवर संशोधन सुरू केलं...मदतनीस रक्स च्या सहाय्यानं त्यांनी अश्या काही कुत्र्यांना पकडून पिंजऱ्यात डांबलं आणि त्यांच्या तोंडाचा फेस-लाळ परीक्षानळीत जमा करत गेले..या लाळेचं इंजेक्शन जेव्हा नाॅर्मल कुत्र्याला दिलं गेलं तेव्हा ते ही पिसाळल्यासारखं करू लागलं.....