Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

दर्जा

रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस  आणि  माणसाचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग  पुरेसा असतो. 

मी भिकारी नाही व्यापारी आहे

एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, “तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला काही देतोस तरी का?” तेव्हा तो भिकारी म्हणाला, “शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?” “अरे, तू जर कुणाला काहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही काही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन.” शेटजी उत्तरले. इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांह...

वारी

  थकून भागून घरी यायला त्याला रात्रीचे २ वाजले. रस्त्यात दिव्यांची सोबत करत तो घरी आला, बिचारी ती वाट बघून बघून थकून गेली आणि सोफ्यावर बसल्या बसल्या तिला कधी झोप लागली हे तिला कळलं ही नाही. ह्याने बेल वाजवली  १० मिनिटं झाली तरी दार उघडलंच नाही, ह्याला भीती वाटू लागली दारावर त्या भीतीपोटी ह्याने जोरात धक्का दिला..तिला त्या आवाजाने जाग आली, तिने दार उघडलं. आधीच कर्तव्याची ओझी पाठीवर घेऊन फिरणारा तो वैतागला होता, दार उघडल्या उघडल्या तो तिच्यावर खेकसलाच "कळत नाही का?, तुला माझ्या कष्टांची किंमतच नाहीये.." वगैरे वगैरे.... ती ही वाट बघून बघून वैतागली होती, ती ही चालू झाली आणि जे नेहमी होत तेच झालं..कर्तव्याच्या ओझ्याने आपल्या हातानेच पोट भरलं आणि प्रेमाने जोरात दार आपटत प्रेम झोपी गेलं.   विचार करत करत काहीवेळाने कर्तव्य ही झोपी गेलं, सकाळी ५ वाजता फोन वाजला म्हणून त्याला जाग आली. समोरून एक चड्डी दोस्त होता..अरे येतोयस ना,  आपल्याला माउलींना सासवड पर्यंत सोडवायला जायचंय. राग एक खूप मोठी गोष्ट सोबत घेऊन फिरत असतो..त्याच नाव अहंकार. तोच सोबत घेऊन त्याने मित्राला चार शिव्या द...

प्रगती

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल  पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको;  ही भावना ज्या माणसाजवळ असते  तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.. जीवनात जगतांना असे जगा की  आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा  आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…

वारस

 वारस            "ही इज स्टेडी नाउ, रिकवरींग फास्ट." मला अर्धवट ग्लानीत हा आवाज ऐकू आला. नक्की हा शांतीचाच आवाज!       मी हळूहळू डोळे उघडले. मला क्षणभर कळेचना मी कुठेय? मग आठवू लागले, 'आम्ही पाच जण मुंबईहून ट्रीप साठी म्हणून केरळला आलो होतो दहा दिवसांसाठी, गेल्या दोन दिवसांपासून केरळचे निसर्ग सौंदर्य बघत भटकंती करत होतो.        धमाल चालु होती. विसरून गेलो होतो, 'मुंबई हॉस्पिटल चे आपण डॉक्टर्स आहोत वगैरे',  त्या नादात पथ्य सगळी गुंडाळून ठेवली होती......आणि व्हायचं तेच झालं, माझं अल्सर चं जुनं  दुखणं उफाळून आलं आणि प्रचंड पोट दुखू लागलं,  उलट्या होऊ लागल्या आणि पुढचं मला आठवेना....       "कसं वाटतय आता?" माझी पल्स पहात डॉक्टर विचारत होत्या, आणि माझी नजर त्यांच्या चेहऱ्यावर खिळली होती. ती नक्की शांतीच होती. पण मग? तिने मला ओळखले नव्हते का? तिचा चेहरा इतका निर्विकार कसा राहू शकतो?      "ठीक", मी तिच्या डोळ्यात पाहून बोललो. पण तिथे मला कसलेच ओळखीचे भाव दिसले नाहीत.    ...

रतन टाटा

१९९५ चा काळ होता. व्हिडिओ प्रोजेक्टर बनवणाऱ्या एका खाजगी कंपनीत 'सेल्स ऑफिसर' म्हणून वेठबिगारी करतं होतो. नावाचाचं 'ऑफिसर', औकात सेल्समनचीच! टाटांची औरंगाबादमध्ये एक हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. त्यांना तिथल्यासाठी दोन प्रोजेक्टर हवे होते. किंमतीविषयी चर्चा करण्यासाठी त्यांच्या गोन्साल्वीस नावाच्या बड्या अधिकाऱ्याने मला मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोरील ताज हॉटेलच्या मागे असलेल्या कार्यालयात सकाळी साडेआठलाच बोलावले होते. एवढ्या मोठ्या समुहाची ऑर्डर कंपनीतल्या आम्हा सगळ्यांनाच खुप महत्त्वाची. उशीर व्हायला नको, म्हणून सकाळी चहासुद्धा न घेता, टापटीप होऊन सकाळी आठलाच तिथे पोहोचलो आणि रिसेप्शनला वर्दी दिली. "साडे आठ बोला था ना तुमको? इतना जल्दी कायको आता?" साठीतली म्हातारी रिसेप्शनीस्ट वसकन अंगावर आली. "सॉरी मॅडम. मैं रूकता हूं" गरजवंताला अक्कलच काय आत्मसन्मानही नसतो! साडे-आठ झाले, नऊ वाजले, दहा वाजले, मग अकरा वाजले! पण मला काही बोलावणे येईना. धाडस गोळा करून परत त्या कैदाशिणीकडे गेलो. "वेट सम टाईम. मिस्टर गोन्साल्वीस इज बिझी" किती वेट करू?  पोट...

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे

अमेरिकन कंपनीला पाणी पाजणारे  अंबरनाथ (मुंबई) चे उद्योजक : -प्रदीप ताम्हाणे  “आमच्या तंत्रज्ञानासाठी तुम्हां भारतीयांना आम्ही मागू तेवढे पैसे द्यावेच लागतील” . अमेरिकन बॉसचे ते शब्द प्रदीपच्या कानात शिसे ओतल्यासारखे ओतले गेले. माझ्या देशाला हा कमी लेखतोय या निव्वळ एका भावनेने त्या भारतीय तरुणाने उत्तम पगार, कार, अलिशान घर नोकरी दोन मिनिटात सोडली. या कंपनीचा प्रतिस्पर्धी म्हणून मी उभा राहिन असा मनाशी चंग बांधला. औषधी गोळ्यांना कलरकोटींग करणाऱ्या जगातील ‘त्या’ एकमेव कंपनीला या पठ्ठ्याने स्वत:चा पर्याय उभा केला. गोऱ्या अमेरिकन बॉसचा माज उतरवला.  शांत असणाऱ्या कोणत्याही भारतीयाला जर डिवचले तर तो काय करु शकतो हे संपूर्ण जगाने पाहिले. ही कहाणी त्या जिगरबाज भारतीय तरुणाची. ही कहाणी आहे, विनकोट ही जगातील दुसरी आणि संपूर्णत: भारतीय बनावटीची औषधी गोळ्यांना कलर कोटींग करणाऱ्या कंपनीच्या मालकाची, प्रदीप ताम्हाणेंची. २६ जानेवारी १९५० साली संपूर्ण भारत देश प्रजासत्ताक झाल्याचा आनंद साजरा करत असतानाच दादर येथील ताम्हाणेंच्या घरी प्रदीपचा जन्म झाला. खरंतर हा योगायोगच म्हणावा लागेल. पोर्त...

आणि देवदूत हसला...!

 आणि देवदूत  हसला...! लिओ टाॅलस्टाॅयची ही एक अतिशय प्रसिद्ध व सुरस कथा आहे...! एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवलं.एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं..तो तिथे पोचला पण...थोडा संभ्रमात पडला.त्या स्त्रीची तीन लहान जुळी ( खरंतर तिळी म्हणतात त्यांना) बाळं रडत होती..त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता आईविना ती अनाथ होणार होती.हे सर्व बघून देवदूताला दया आली तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हाताने यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली ती ऐकून यमराज भडकले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का?? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्गनियमांमधे हस्तक्षेप करत नाही मग तू कोण एवढा मोठा लागून गेलास?त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे मी दुसर्‍या दूताकरवी ते काम करीनच पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल व जोपर्यंत तू स्वतः तीनवेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्या मूर्खपणावर स्वतःच  हसणार नाहीस तो पर्यंत तुझी सुटका होणार नाही...तू इथे परत येऊ शकणार नाहीस.(इथे...